मुंबई : अभिनेता सनी देओलचा गदर २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना दुसरीकडे सनी देओलने कर्जापोटीच्या ५६ कोटींची परतफेड केली नसल्याची माहिती समोर आली आहे. ५६ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २५ सप्टेंबरला हा लिलाव होणार आहे.

हेही वाचा – “नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…”; ठाकरे गटाकडून मोठी ‘ऑफर’

हेही वाचा – “केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई?” मनसेनं व्यक्त केली शंका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील सनी व्हिला नावाचा बंगला त्यासाठी तारण ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओल यांनी केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ५१ कोटी ४३ लाख रुपये अशी बोली लावण्यात आली आहे.