मुंबई : प्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या मोटारगाड्यांची चीनमधून आयात करण्यात येत असून, देशातील पहिले टेस्ला शो रूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिल्या ‘टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर’ चे उदघाटन केले. तर, या टेस्ला कंपनीच्या मोटारीला टोलमाफीही मिळाली आहे.

वाहनचालक राज्यातील महामार्गावरून टेस्ला कार चालवतीलल, त्यावेळी त्याला कोणताही पथकर द्यावा लागणार नाही. राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे टेस्ला वाहनचालकांला पथकरातून सवलत मिळेल.

उपमुख्यमंत्र्यांनी चालवली टेस्ला

विधानभवन परिसरात बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशात दाखल झालेल्या टेस्ला कारचे सारस्थ केले. शिंदे यांच्यासमवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील होते.

मुंबईत कोणते मॉडेल दाखल

टेस्लाने भारतात पहिली विद्युत कार मॉडेल ‘वाय’ १५ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे भारतात दाखल केली आहे. मॉडेल ‘वाय’ हे पहिले टेस्लाचे मॉडेल आहे. ज्याची किंमत सुमारे ६० लाख ते ६८ लाख रुपये आहे. ही कार चीनमधील शांघाय गिगा फॅक्टरीमधून आयात करून मुंबईत विक्री करण्यात येणार आहे.

मुंबईत टेस्ला महागली

अमेरिका, चीन किंवा जर्मनीच्या तुलनेत मुंबईत दाखल झालेल्या टेस्ला कारची किंमत अधिक आहे. मुख्यत: आयात शुल्कामुळे मोटारीच्किंया मतीतील वाढ झाली आहे.

राज्य सरकारचे विद्युत वाहनांना प्राधान्य

पेट्रोल, डिझेलची वाहने वापरल्याने, या वाहनांतून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन आणि धुरामुळे प्रदुषणाचा धोका वाढतो. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हवा प्रदुषणात वाढ झाल्याने जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. त्यामुळे विद्युत वाहनांचा वापर करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी, शून्य उत्सर्जन कार्बनकडे वाटचाल करण्यासाठी राज्य सरकार विद्युत वाहनांना चालना देत आहे. त्यामुळे विद्युत वाहनांना पथकरातून १०० टक्के सवलत दिली आहे.

विदयुत वाहनांना पथकरमुक्ती

राज्यातील नागरिकांनी विद्युत वाहन खरेदी करावे, विद्युत वाहनांचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने नवीन धोरण आणले आहे. २३ मे २०२५ मध्ये याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे राज्यातील मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी विद्युत वाहनांना १०० टक्के पथकर माफी दिली आहे.

माफ करण्यात येणाऱ्या पथकराच्या रकमेची प्रतिपूर्ती अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास करण्यात येईल. तसेच राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या उर्वरित राज्य मार्गावर विद्युत वाहनांना टप्याटप्याने पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीद्वारे घेण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेस्लाला पथकरमुक्ती कशी आणि कुठे मिळणार

मुंबईत टेस्लाची पहिली विद्युत मोटारगाडी दाखल झाली आहे. टेस्लाची मोटारगाडी विद्युत असून राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार, मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर धावणाऱ्या टेस्लाला १०० टक्के पथकर माफी मिळण्याची शक्यता आहे.