Vandre East Assembly constituency 2024 Congress Zeeshan Siddique : वांद्रे पूर्व हा मतदारसंघ उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला हा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हातून निसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला. शिवसेनेने केलेल्या एका चुकीमुळे त्यांना त्यांचा बालेकिल्ला गमवावा लागला. आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांच्या ताब्यात आहे. झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मात्र झीशान सिद्दीकी यांनी काँग्रेसमध्ये थांबणं पसंत केलं आहे. ते देखील अजित पवार गटात प्रवेश करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांची या मतदारसंघावर (Vandre East Assembly constituency) पकड होती. ते वांद्रे पूर्वेकडील एका वॉर्डमधून १९९७ ते २००९ पर्यंत नगरसेवक होते. २००९ मध्ये त्यांना शिवसेनेने येथून विधानसभेचं तिकीट दिलं आणि सावंतांनी ही निवडणूक जिंकली. २०१४ साली पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकीटावर ते येथून आमदार म्हणून विधानसभेवर गेले. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं. बाळा सावंतांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने बाळा सावंतांची पत्नी तृप्ती सावंत यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर, काँग्रेसने नारायण राणे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र सावंत यांनी नारायण राणेंचा तब्बल १९ हजार मतांनी पराभव केला.

Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर!…
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड
uttar pradesh leaders in pune for candidates campaigning maharashtra assembly election 2024
विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा
Amravati Assembly Election 2024
Amravati Assembly Election 2024 : अमरावती जिल्‍ह्यात अटीतटीच्‍या लढती; मैत्रिपूर्ण लढत, बंडखोरी, जुन्‍या-नव्‍यांचा संघर्ष
2938 candidates withdraw
Maharashtra Assembly Election 2024 : अखेरच्या दिवशी हजारो इच्छुकांची माघार; २८८ जागांवर ‘इतके’ उमेदवार लढणार

हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?

शिवसेनेतील अंतर्गत वादाचा काँग्रेसला फायदा, यावेळी मविआतील संगर्षामुळे नुकसान होणार?

नारायण राणेंसारख्या मोठ्या नेत्याचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांच्याकडे पक्षाने २०१९ च्या निवडणुकीवेळी दुर्लक्ष केलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिलं नाही. शिवसेनेने मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विधानसभेच्या रिंगणात उतरलं. पक्षाच्या या निर्णयामुळे तृप्ती सावंत नाराज झाल्या आणि त्यांनी ही निडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. याचे शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागले. उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघातील मतदार आहेत तोच मतदारसंघ शिवसेनेने गमावला. त्या निवडणुकीत ना शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, ना तृप्ती सावंत विजयी झाल्या. शिवेसनेतील अंतर्गत वादाचा काँग्रेसला फायदा झाला. काँग्रेसचे झीशान सिद्दीकी येथून आमदार म्हणून निवडून आले.

हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!

दरम्यान, पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणार की शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा प्रश्न आहे. ही जागा काँग्रेसला सुटल्यास काँग्रेस झीशान सिद्दीकांना पुन्हा उमेदवारी देणार की नवा उमेदवार उभा करणार असाही प्रश्न मतदारांना पडला आहे. तर महायुतीतही ही जागा कोणाला मिळणार हे ठरलेलं नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत झीशान सिद्दीकी अजित पवार गटात गेले तर महायुतीत ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सुटेल आणि पक्ष सिद्दीकांना येथून उमेदवारी देऊ शकतो. मात्र झीशान सिद्दीकी काँग्रेसमध्येच थांबले तर या जागेवर भजापा व शिंदे गट दावा करू शकतो.

Vandre East Assembly constituency : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

झीशान सिद्दिकी (काँग्रेस) – ३८,३३७ मतं
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) – ३२, ५४७ मतं
तृप्ती सावंत (अपक्ष) – २४,०७१ मतं

हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार

Vandre East Assembly constituency : २०१५ च्या पोटनिवडणुकीचा निकाल

तृप्ती सावंत (शिवसेना) – ५२,७११ मतं
नारायण राणे (काँग्रेस) – ३३,७०३ मतं

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

Vandre East Assembly constituency : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

प्रकाश सावंत (शिवसेना) – ४१,३८८ मतं
कृष्णा पारकर (भाजपा) – २५,७९१ मतं

हे ही वाचा >> Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : सपाच्या अबू आझमींसमोर महायुतीचा निभाव लागणार का?

Vandre East Assembly constituency : २००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

प्रकाश सावंत (शिवसेना) – ४५,६५९ मतं
जनार्दन सावंत (काँग्रेस) – ३८,२३९ मतं

ताजी अपडेट

वांद्रे पूर्व मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण २५ इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १ अर्ज बाद करण्यात आला आहे, तर. २४ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. मनसेने येथून माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने (अजित पवार) येथून विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांना, तर शिवसेनेने (ठाकरे) वरुण सरदेसाई यांना येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.