मुंबई : बारदान (पोती) नसल्यामुळे पंधरा दिवसांपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे. ६ जानेवारीपर्यंत उद्दिष्टच्या जेमतेम २९ टक्केच खरेदी झाली आहे. खरेदीपोटी नाफेडकडे शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये थकले आहेत. सोयाबीनमधील ओलाव्यासह अन्य कारणांनी पहिल्या दिवसापासूनच सोयाबीन खरेदीत गोंधळ सुरू आहे.

राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ५० लाख हेक्टरवर गेले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. पण, खासगी बाजारात सोयाबीनची जेमतेम चार हजार रुपये दराने विक्री सुरू झाली आहे. शेतकरी नुकसान टाळण्यासाठी हमीभावाने विक्री करण्यासाठी धडपडत आहेत. सहा जानेवारी अखेर राज्यातील एकूण ७ लाख ४४ हजार ७५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. २ लाख ६ हजार ९९० शेतकऱ्यांकडून ४ लाख २६ हजार ०८७ टन सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे. केवळ सोयाबीन भरण्यासाठी पोती (बारदाणा) नाहीत म्हणून गत १५ दिवसांपासून खरेदी रखडली आहे. इतका अनागोंदी कारभार नाफेडकडून सुरू आहे. सोयाबीन खरेदी पोटी शेतकऱ्यांना देय असलेली सुमारे १५० कोटी रुपयांची रक्कमही नाफेडकडे थकली आहे.

government failed to purchase soybeans from registered farmers affecting thousands of soybean growers
नोंदणीनंतरही सोयाबीन खरेदी नाहीच, शेतकऱ्यांना फटका, तर फरकाची रक्कम…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
soybean news in marathi
नोंदणी केलेल्या पाच हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही रखडली, शासनाकडे मुदत वाढवण्याची मागणी
pune crime latest news in marathi
पुणे: ग्राहकाकडून भाजी विक्रेत्यावर चाकूने वार, खडकी भाजी मंडईतील घटना
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
How much extension for soybean purchase Mumbai print news
सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा; जाणून घ्या, सोयाबीन खरेदीला किती मुदतवाढ
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Farmers administration and government conflicted over soybean guaranteed purchase price 57 percent purchased
शेतकरी, सरकारची ‘ सोयाबीन कोंडी’ जाणून घ्या, नेमकी स्थिती, तूर खरेदीचे काय होणार

हे ही वाचा… Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्लीत आप व काँग्रेस आमनेसामने, ठाकरे गट कुणाच्या पाठिशी? संजय राऊत म्हणाले…

हमीभावाने सोयाबीन खरेदीचा बोजवारा उडाल्याची गंभीर दखल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेऊन बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत रावल यांनी पणन मंडळ आणि नाफेडच्या गोंधळी कारभारची झाडाझडती घेतली. सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी आणि प्रत्यक्ष विक्रीला ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या ३० दिवसांत केंद्र सरकारने दिलेले १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्टे पूर्ण करा. शेतकऱ्यांचे थकलेले १५० कोटी तीन दिवसांत द्या. त्यानंतर होणाऱ्या खरेदीचे पैसे दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. बारदाणे (पोती) १४ जानेवारीपर्यंत उपलब्ध होतील. पण, त्याची वाट पाहू नका. शेतकऱ्यांकडील उपलब्ध असलेल्या बारदाण्यातून खरेदी सुरू करा, असे आदेश मंत्री रावल यांनी दिले आहेत.

राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र – ५० लाख हेक्टर.
हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी – ७ लाख ४४ हजार ७५७ शेतकरी.
खरेदी केलेले शेतकरी- २ लाख ६ हजार ९९०.
एकूण खरेदी केलेले सोयाबीन – ४ लाख २६ हजार ०८७ टन.
नाफेडकडे थकीत रक्कम – १५० कोटी.

Story img Loader