15 August 2020

News Flash

अरुण गवळीला तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश, पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार

कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे

कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. अरुण गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याने आपण कोणतंही गैरकृत्य तसंच लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद केला. पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचं उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही असं सांगितलं. तसंच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचं खंडपीठाने नमूद केलं. यामुळे अरुण गवळीला पुन्हा कारागृहात परतावं लागणार आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी ते नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे अरुण गवळी जवळपास ४५ दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर कारागृहातून बाहेर आला होता. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं. पण याचवेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्विकारत १० मे पर्यंत अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत २४ मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. पण आता न्यायालयाने अजून वाढ देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान पॅरोलवर बाहेर असताना अरुण गवळीची योगिताचा विवाहसोहळा पार पडला. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अत्यंत साध्या पद्धतीने दगडी चाळीमध्येच हा विवाह पार पडला. योगिता अभिनेता अक्षय वाघमारेसोबत विवाहबद्ध झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 11:38 am

Web Title: hc rejects application to extend parole leave arun gawli sgy 87
Next Stories
1 मुंढेंच्या हट्टामुळेच नागपूर पुन्हा लाल क्षेत्रात!
2 औषधवैद्यक, भूलतज्ज्ञ वगळता अनेक डॉक्टर गैरहजर
3 जैवविविधता मंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याबाबत वनमंत्री अनभिज्ञ
Just Now!
X