News Flash

एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे मृतावस्थेत 

खापाच्या ज्या जंगलात वाघिणीने या बछड्यांना जन्म  दिला, त्या परिसरात गेल्या २५ वर्षांपासून वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्याची नोंद नाही.

भंडारा येथील धक्कादायक प्रकार, नैसर्गिक मृत्यूची नोंद; मात्र वनखात्याच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह

नागपूर : व्याघ्रसंरक्षणाची गरज गेल्या काही वर्षांपासून देशासह जागतिक पातळीवर मांडली जात असताना, राज्यातील वनखात्याच्या दुर्लक्षामुळे वाघ आणि बछड्यांच्या हकनाक मृत्यूच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. बुधवारी भंडारा जिल्ह्यात  एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे मृतावस्थेत आढळले.

येथील एका कालव्यानजीक असलेल्या उपसा विहिरीत वाघाच्या दोन बछड्यांचा बुडून मृत्यू झाला, तर उपचार करून जंगलात सोडण्यात आलेला आणखी एक बछडा मृतावस्थेत आढळला. या दोन्ही घटना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी वनखात्याच्या देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित के ले जात आहे.

खापाच्या ज्या जंगलात वाघिणीने या बछड्यांना जन्म  दिला, त्या परिसरात गेल्या २५ वर्षांपासून वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्याची नोंद नाही. त्यामुळे वाघीण गर्भवती असल्याचे आणि त्या वाघिणीच्या जवळ वाघाचा वावर असल्याचे कॅ मेरात कैद झाल्यानंतर  त्यावर देखरेख ठेवणे आवश्यक होते. बछड्याचे मृत्यू नैसर्गिक असले तरीही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे भंडारा येथील मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान यांनी सांगितले.

पशुवैद्यकांची कमतरता… 

या घटनांमुळे वनखात्याकडे तज्ज्ञ वन्यजीव पशुवैद्यकांची कमतरता असल्याचे सिद्ध झाले आहे, तर तिसऱ्या एका घटनेत भंडारापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील धारगाव येथे पूर्ण वाढ झालेल्या नर अस्वलाचा मृत्यू झाला. अस्वलाच्या तोंडाजवळ रक्त होते तसेच परिसरात अनेक ठिकाणी रक्त सांडलेले दिसून आले. त्यामुळे  या अस्वलाला वाहनाने धडक दिली असावी, असा अंदाज आहे.

दोन घटना…

भंडारा वनक्षेत्रातील कक्ष क्र . १७८ मध्ये वाघाचे दोन महिन्यांचे दोन बछडे मृतावस्थेत असल्याचे काही युवकांना आढळले. वनविभागाच्या तपासात कालव्यानजीक वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्या. त्यावरून वाघिणीने बछड्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न के ला, पण ती अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर पवनी येथून वनखात्याने उपचारांसाठी आणण्यात आलेल्या वाघाच्या बछड्याला मंगळवारी सोडून दिले होते. बुधवारी तो बछडा मृतावस्थेत आढळला.

 

वनखात्याची अनभिज्ञता…

कोका अभयारण्यातील ‘मस्तानी’ या वाघिणीचा एक बछडा मोठा झाल्यानंतर या परिसरात स्थलांतरित होत त्याने अधिवास निर्माण के ला. त्याच वाघापासून वाघीण गर्भवती असल्याचे खात्यातील अधिकाऱ्यांना माहिती नाही. कॅ मेऱ्यात छायाचित्र नोंद झाल्यानंतर त्यांना माहिती झाले, पण त्यानंतरही त्यावर लक्ष ठेवण्यात खात्याची यंत्रणा कमी पडली. विशेष म्हणजे, या दोन्ही बछड्यांचा मृत्यू हा वन अधिकाऱ्यांऐवजी वनपे्रमी युवकांमुळे उघड झाला.

पूर्ण बरा झालेला नसताना?

पवनी येथे मृत पावलेल्या वाघाच्या दीड महिन्याच्या बछड्याला दोन दिवसांपूर्वी वनखात्याच्या चमूने उपचारासाठी जेरबंद के ले होते. शरीरातील पाणी कमी झाल्याने आजारी अवस्थेत तो त्यांना जंगलात आढळला. मात्र, तो पूर्ण बरा झाला आहे किं वा नाही हे तपासण्यापूर्वीच मंगळवारी त्याला जंगलात सोडण्यात आले अन् बुधवारी तो मृतावस्थेत आढळून आला.

भंडारासह गोंदिया जिल्ह्यातही अनेक परिसरात वाघांच्या हालचाली सुरू असताना वनखाते अनभिज्ञ आहे. या दोन्ही घटनांनी वाघांच्या देखरेखीत खात्याची यंत्रणा कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भविष्यात वाघांचे दुर्दैवी मृत्यू थांबवायचे असतील तर देखरेखीची यंत्रणा अधिक मजबूत करावी लागणार आहे. – सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:58 am

Web Title: three tiger calves died on the same day akp 94
Next Stories
1 आता म्युकरमायकोसिसचे संकट
2 प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक खाटा नागपुरात
3 लहान मुलांवर लस चाचणीचे संकेत
Just Now!
X