नागपूर : नवविवाहित असलेल्या ३० वर्षीय शेजारच्या वहिणीवर १८ वर्षांच्या युवकाचा जीव जडला. त्याने घरी येणे-जाणे वाढवून मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल नंबर घेऊन वहिणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, वहिणीने पती घरी येताच मॅसेज दाखवला. पारा चढलेल्या अवस्थेतच त्याने शेजारच्या युवकाची जबरदस्त धुलाई केली. त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली. मनिष ठाकरे असे आरोपीचे नाव आहे.
मनिष ठाकरे हा कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. त्याच्या घराशेजारच्या युवकाचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. त्या युवकाची ३० वर्षीय नवविवाहित पत्नी मनिषला आवडायला लागली. काही दिवसांतच तो त्या वहिणीच्या प्रेमात पडला. वहिणीवर एकतर्फी प्रेम करायला लागला. वहिणीशी ओळखी वाढावी म्हणून तो वारंवार वहिणीच्या घरी जात होता. त्याने वहिणीकडे मोबाईल नंबर मागितला. तो वारंवार महिलेला मॅसेज करायला लागला.




हेही वाचा >>> सराफा दुकाने आणि बँकांसाठी सतर्कतेचा इशारा…
तीसुद्धा त्याच्या मॅसेजला उत्तर देत होती. त्यामुळे मनिषला वाटले की महिलासुद्धा प्रेमात पडली. त्यामुळे त्याने लांबलचक मॅसेज लिहिला आणि त्यात तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे भडकलेल्या महिलेने पतीला ही बाब सांगितली. तिच्या पतीने मनिषला चांगला चोप दिला. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.