लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: रामटेक पोलीस ठाणे हद्दीत एका मुलीला पाण्यात गुंगी सदृष्य औषध मिसळून २० वर्षीय युवकाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रसंगी मुलीचे भ्रमनध्वनीवर अश्लिल चलचित्र काढत ही माहिती कुणाला सांगितल्यास ते प्रसारित करण्याची धमकीही दिली.

गणेश धुर्वे (२०) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेची आजारी आई रामटेकच्या रुग्णालया दाखल असल्याने तिला डबा देण्यासाठी पीडिताचे वडील रुग्णालयात गेले होते. पीडितेचा भाऊ काही काम असल्याने तेथून निघून गेला.

हेही वाचा… ‘वृत्तपत्रांना जाहिराती द्या व कार्यक्रमाचे आयोजन करा’, कोण म्हणतंय असं व कारण काय? जाणून घ्या…

घरी असलेल्या पीडितेने लोट्यात वाचलेले पाणी प्यायले. त्यानंतर पीडितेला भोवळ येऊ लागल्याने ती घरातील बिछान्यावर झोपली. त्यानंतर आरोपी गणेशने तिच्यावर बलात्कार करत त्याचे भ्रमनध्वनीवर चलचित्र काढले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.