नागपूर: नागपूर ग्रामीण पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने एका तरुणीवर बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यानंतर तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिचा गर्भपात केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फाल्गून सतीश रिंगणे (३४, रा.अरोरा टाऊन, सुगतनगर, जरीपटका) असे आरोपीचे नाव असून सध्या तो फरार झाला आहे.

सतीश रिंगणे हे नागपूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधिकारी होते. त्यांचा मुलगा आरोपी फाल्गून हा लॅब टेक्निशयन असून सध्या डोंगरगाव येथे राहतो. तो अनेक रुग्णालयात रक्त व लघवीचे नमुने गोळा करायला जात होता. दरम्यान एका रुग्णालयात परीचारिका असलेल्या २१ वर्षीय तरुणी स्विटीशी (बदललेले नाव) त्याची ओळख झाली. त्याने रुग्णालयाच्या कामाच्या बहाण्याने तरुणीची भ्रमणध्वणी क्रमांक घेतला. त्यानंतर तो स्विटीला वारंवार मॅसेज पाठवायला लागला. तिच्या रुग्णालयात नेहमी येत असल्याने त्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

हेही वाचा… नोकरभरती सुरू असताना ‘बार्टी’च्या ७५ हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण बंद; शासनाकडून विधानसभेत दिशाभूल करणारे उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आईवडिल गावी गेल्याची संधी साधून मार्च २०२० मध्ये तिला घरी घेऊन गेला. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर फाल्गुनने बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. तिने गर्भवती झाल्याचे सांगून लग्न करण्याबाबत विचारले. त्याने लग्नास नकार देऊन गर्भपात करण्याचा सल्ला दिला. प्रेमात दगा दिल्यामुळे स्विटीने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने स्विटीला घरी बोलावले आणि तिला जबर मारहाण करीत गर्भपात करण्यास बाध्य केले. प्रेमात दगा दिल्यामुळे नैराश्यात गेलेल्या स्विटीने जरीपटका पोलीस ठाणे गाठले. तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीला गुन्ह्याबाबत माहिती मिळताच तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.