बुलढाणा: लोकार्पण झाल्यापासून नियमित अपघाताने वादग्रस्त ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आज उत्तररात्री झालेल्या अभूतपूर्व अपघाताने संबंधित यंत्रणाही हादरल्याचे चित्र आहे.
आज उत्तररात्री दोन वाजताच्या सुमारास सिंदखेड राजा हद्दीतील चॅनेल ३३२ येथे झालेला भीषण अपघात हा शब्द कमी ठरावा असाच होता. रात्रीची घटना असल्याने यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. घटनास्थळी दाखल झालेले महामार्ग पोलीस, क्यूआरव्ही पथक व सिंदखेड राजा पोलीसदेखील अपघाताचे दृश्य पाहून हादरले. रात्रीची वेळ असल्याने नागरिक मदतीला नव्हते.
हेही वाचा – Buldhana Accident : मृतांमध्ये नागपूरच्या सात प्रवाशांचा समावेश, पाचजणांची ओळख पटली
८ जण बचावले
या अपघातात लक्झरीचा चालक शेख दानिश शेख इस्माईल (५०, रा. दारव्हा, जिल्हा यवतमाळ) क्लिनर संदीप राठोड (३१, रा. तिवसा जिल्हा अमरावती) योगेश गवई (संभाजीनगर) साईनाथ पवार (१९ माहूर) शधिकांत गजभिये (यवतमाळ) पंकज रमेशचंद्र (हिमाचल प्रदेश) हे जखमी झाले. चालक व क्लिनरला सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.