नागपूर: आपापल्या मतदारसंघातील रेल्वेगाडी, रेल्वे स्थानक, पायाभूत सोयी-सुविधा आणि इतर संबंधित बाबींवर प्रशासनाशी चर्चा करणे आणि वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे आयोजित वार्षिक बैठकीत विदर्भातील एक राज्यसभा सदस्य सोडल्यास इतर खासदारांनी स्वत: दांडी मारली आणि केवळ आपले प्रतिनिधी पाठवून सोपस्कार पार पाडले.

मध्य रेल्वेने शुक्रवारी रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागातील खासदारांची वार्षिक बैठक नागपुरातील विभागीय रेल्वेस्थापक कार्यालयात आयोजित केली होती. बैठकीचे निमंत्रण खासदारांना दिले होते. या बैठकीत रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या समस्या खासदारांनी प्रशासनाकडे मांडणे अपेक्षित असते.

हेही वाचा… आमदार प्रतिभा धानोरकर सोनिया, राहुल गांधींपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या भेटीला

परंतु अमरावतीचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे वगळता कोणीही बैठकीला आले नाही. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, खांडवाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, बैतुलचे खासदार दुर्गादास उईके यांची उपस्थिती होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक तुषार कांत पांडे आणि भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस. केडिया प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा… भंडारा: पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुविधांशी निगडित विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर आणि भुसावळ विभागात गेल्या काही महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली. यामध्ये नवीन रेल्वेमार्ग, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, रेल्वेचा तिसरा मार्ग, विद्युतीकरण, पादचारी पूल, रेल्वे भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाण पूल उभारून रेल्वे क्रॉसिंग बंद करणे, अमृत भारत स्टेशन नियोजन, स्टेशन पुनर्विकास नियोजन, उदवाहक, फिरता जिना, नवीन फलाट आदी बाबत खासदांना माहिती देण्यात आली.