अमरावती: करोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर रेल्‍वेगाड्यांसह सर्वसामान्यांना परवडणारी भुसावळ- नागपूर पॅसेंजर बंद करण्यात आली. सद्यःस्थितीत रेल्वे बोर्डातर्फे विविध पॅसेंजर आणि मेमू रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत असून अनेक गाड्यांना विविध स्थानकांवर थांबाही देण्यात येत आहेत. परंतु नागपूर-भुसावळ पॅसेंजर तीन वर्षांपासून बंदच आहे. त्‍यामुळे नियमित कामांसाठी, नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

करोनाचा भीषण काळ संपून जवळपास तीन वर्ष होत आहेत. रेल्वे बोडातर्फे अनेक पॅसेंजर व मेमू रेल्वेगाड्याही पूर्ववत करण्यात आल्या आहेत. मात्र नागपूर-भुसावळ- पॅसेंजर अजूनही सुरू करण्‍यात आलेली नाही. नोकरपेशा लोकांसाठी ही पॅसेंजर सोयीची होती. पश्चिम विदर्भ ते पूर्व विदर्भाला जोडणारी ही पॅसेंजर सर्वच स्‍थानकांवर थांबत होती.

हेही वाचा… प्रियकर करायचा वारंवार शारीरिक संबंधाची मागणी, प्रेयसीने कंटाळून….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ५१२८६ नागपूर-भुसावळ पॅसेंजर दररोज पहाटे ४.५० वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करून दुपारी २.५५ वाजता भुसावळ स्थानक गाठत होती. ५१२८५ भुसावळ- नागपूर पॅसेंजर भुसावळ येथून सायंकाळी ७.३० वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचायची. सद्यःस्थितीत नागपूर येथून सकाळी ८ वाजता सुटणारी आणि वर्धा येथे सकाळी १० वाजता पोहोचणारी ०२३७४ नागपूर -वर्धा मेमू आणि वर्धा येथून सायंकाळी ५.१५ वाजता प्रस्थान करणारी आणि नागपूर येथे सायंकाळी ७.३० वाजता पोहचणारी ०२३७३ वर्धा-नागपूर मेमू गाडी सुरू आहे. एप्रिल महिन्यात गाडी क्रमांक १११२१ भुसावळ-वर्धा मेमू आणि १११२२ वर्धा-भुसावळ मेमू सुरू करण्यात आली आहे. परंतु भुसावळ-नागपूर पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवाशांना इतर रेल्वेगाड्या व बसगाड्यांचा शोध घ्यावा लागतो. यात भाड्याचे अधिक पैसेसुद्धा मोजावे लागत आहेत.