नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला रोज प्रतिसाद वाढत आहे. शुक्रवारी (२७ ऑक्टोंबर) तिसऱ्या दिवशी संपकर्त्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या गैरसोयी वाढण्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान आंदोलकांनी नागपुरातील संविधान चौकात निदर्शने केली.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात गुरूवारी (२५ ऑक्टोंबर) ४ हजार ३३५ कर्मचारी संपात सहभागी होते. ही संख्या शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) ४ हजार ४३० इतकी नोंदवली गेली. त्यामुळे रोज संपकर्त्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आयुषअंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील कर्मचारी व तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अर्धपरिचारिका, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे बहुतांश अधिकारी- कर्मचारी संपावर असल्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात डायलेसिसची संख्या कमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे यांनी आरोग्य विभागाने सगळ्याच रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक उपाय केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे डायलेसिससह इतर सगळ्याच प्रक्रिया सुरळीत असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा… भाजपने आरक्षणाच्या प्रश्नाला हात न लावता राज्य व देश लूटला; नाना पटोले आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आंदोलकांनी शुक्रवारी नागपुरातील संविधान चौकात सरकारच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्या सेवा कायम करण्याची मागणी केली. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनाच्या नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उन्मेश कापसे म्हणाले, शासनाला बऱ्याचदा मुदत दिल्यावरही काहीही होत नसल्याने शेवटी नाईलाजाने हक्कासाठी संपावर जावे लागले. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलक ३० आणि ३१ ऑक्टोंबरला मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होणार आहे.