वर्धा : पुणे नागपूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेस जोरदार प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाडीचा या दरम्यान पहिला थांबा वर्धा स्थानकाचा होता. म्हणून तिला इथे उतरविण्यात आले. रेल्वे पोलिसांना सूचित केल्यावर त्यांच्या मदतीने महिलेस प्रतिक्षागृहात नेण्यात आले. रेल्वेचे डॉक्टर धावपळ करीत पोहोचले. इथेच प्रसूती झाली. मुलाचा जन्म झाला. आईने सुटकेचा निःश्वास टाकला.

हेही वाचा – वन शहीद दिन आणि जोधपूर किल्ल्याचा काय संबंध माहितीये? ११ सप्टेंबर १७३० ला जे घडले ते इतिहासात…

हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्षागृहात आनंद पसरला. बाळासह आईस लगेच मग सामान्य रुग्णालयात पुढील देखरेखीसाठी पाठविण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात येते. आई रत्नादेवी दयाला ही मूळ छत्तीसगड येथील असून नागपुरात भाड्याने राहते. पती पुणे येथे काम करीत असून नातेवाईकांसह गरोदर अवस्थेत ती प्रवासाला निघाली होती.