भंडारा : फेसबुकवर दोघांची मैत्री झाली. मात्र मैत्री निस्वार्थ नव्हती. मित्राकडून मैत्रिणीला वारंवार शारीरिक संबंधांसाठी विचारणा केली गेली मात्र तरुणी त्यासाठी नकार दिला. एके दिवशी घरी सोडून देण्याच्या बहाण्याने मित्राने मैत्रिणीला नशेच्या गोळ्या दे तिच्यावर बलात्कार केला एवढेच नाही तर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या तक्रारीवरून अखेर या दोघांच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवरून झालेल्या मैत्रीत अशा घटना सातत्याने पुढे येत असताना भंडाऱ्यातून अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. फेसबुकवर तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली दोघांच्या मैत्रिणीला मैत्रीला फार काळ झालेला नसताना तरुणाने तिला भलत्याच गोष्टीसाठी आग्रह धरला मात्र तरुणीने त्याची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिल्यानंतर त्याने बळजबरीने स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा डाव रचला. मैत्रिणीला एकांतात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी भंडारा शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध भादंविच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही २२ वर्षांची आहे. फेसबुकच्या माध्यमातून तिची आरोपी सोबत व आणि नंतर मैत्री झाली. आरोपींची प्रज्वल प्रशांत पांडे (२७) आणि मोहित दिनेश बांते (२९) अशी आहे, दोघेही बेला येथील आंबेडकर वॉर्डचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल पांडेने तरुणीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले. या काळात तो तिला अनेक वेळा भेटला आणि लग्नाचे आश्वासन देऊन प्रेम व्यक्त केले. काही काळानंतर त्याने तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरला . मात्र, पीडितेने आरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता.
अखेर २० सप्टेंबर रोजी रात्री ९:३० ते १० च्या दरम्यान प्रज्वल पांडे याने तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या दुचाकीवरून बेला येथील कॅनाल रोडवर घेऊन गेला. तिथे तिला काही नशायुक्त पदार्थ देण्यात आल्याचा आरोप आहे.
अंमली पदार्थ पाजून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. यादरम्यान, दुसरा आरोपी मोहित बांते यानेही तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिने प्रतिकार केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भंडारा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.