नागपूर: केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. संविधान चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

संविधान चौकातून मिरवणूक निघाली असून आकाशवाणी चौकात नितीन गडकरी जनतेला संबोधित करणार आहे. मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष गट, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. 

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रशांत पवार, लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष. सतीश लोणारे देखील उपस्थित होते.

हेही वाचा – ५४ वर्षांनंतर कॉंग्रेसकडून चंद्रपूरमध्ये महिला उमेदवार

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

आकाशवाणी चौकात जनतेला संबोधित केल्यानंतर नितीन गडकरी आणि राजू पारवे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.