बुलढाणा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपच्या ताब्यातील चिखली विधानसभा मतदारसंघासंदर्भातील पत्रपरिषद अंतिम टप्पायत असतानाच कार्यलयाजवळ येऊन भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नारेबाजी केली. यामुळे जयस्तंभ चौक परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त लावला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषद घेतली. याच वेळी भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयासमोर जमले. त्यांनी आमदार श्वेता महाले यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस कार्यालयाच्या आत राहुल बोंद्रे आणि अन्य पदाधिकारी बसून होते. भाजपचे कार्यकर्ते राहुल बोन्द्रे यांच्या विरोधात घोषणा देत होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

vasai bjp aggressive
कारवाई होत नसल्याने भाजप कार्यकर्ते हवालदिल; केंद्रात, राज्यात सत्ता, मात्र वसईत कुणी दाद देईना
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
vasai Bahujan vikas aghadi marathi news
वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक
Tanaji Sawant and ajit pawar
अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”
conflict between bjp and uddhav Thackeray
सावंतवाडी: भाजपा – उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
Tension in Koregaon Constituency due to banner tearing
फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर

हेही वाचा >>> अमरावती : अप्पर वर्धा धरणाची तीन दारे उघडली, प्रतिसेकंद ४७ घनमीटर पाण्याचा विसर्ग

आरोप काय?

यापूर्वी स्थानिय जयस्तंभ चौकातील गांधी भवन परिसरातील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी पत्रपरिषद घेतली. आज सोमवारी, ५ ऑगस्टला संध्याकाळी उशिरा पार पडलेल्या या पत्रपरिषदेत बोन्द्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्ते बांधकामात ५६ कोटी रूपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यांनी या आरोपाद्वारे चिखली च्या आमदार श्वेता महाले यांना थेट लक्ष्य केले. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमध्ये हा गैरव्यवहार करण्यात आला असून अंदाजपत्रक मध्ये एक आणि प्रत्यक्ष बांधकामात एक अशी ही कामे करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> वर्धा : सरपंचाची बनवाबनवी अन् विद्यार्थ्यांना मनस्ताप; जंगलात पायपीट, पोलिसांकडे तक्रार

रस्त्यावरील झाडे तोडणे, काळी माती खोदणे, कच्चा मुरूम खोदणे, त्यानंतर पक्का मुरूम आणून टाकणे,त्यावर ८० मिमी ची खडी पसरविणे ,पुन्हा मुरूम टाकून   ४० मिमी आकाराची खडी  टाकून मुरूम पसरविणे असे अंदाजपत्रक मध्ये नमूद होते.मात्र प्रत्यक्षात फक्त ४० मिमी आकाराची खडी टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस जिल्हा अ ध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला. मात्र बिल (देयक) तब्बल २५ लाख रुपयांचे काढण्यात आले. चिखली मतदारसंघातील ३५० पाणंद रस्त्यांची कामे अशीच मनमानी पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मापदंडाचे उल्लंघन करून करण्यात आली.यामध्ये तब्बल ५६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करून माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी करून पत्र परिषद मध्ये खळबळ उडवून दिली. शासनाने उच्च स्तरीय समिती नेमावी. या समीतीने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या पाणंद रस्ते बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली. यापूर्वी लोकसहभागातून मतदारसंघात  तयार करण्यात आलेले पाणंद रस्ते कितीतरी चांगले होते आणि त्याचा दर्जा कैकपटीने चांगला होता. या रस्त्यावर २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असताना ८ लाख रुपये खर्चून थातुरमातुर कामे करण्यात आल्याचे राहुल बोन्द्रे यावेळी म्हणाले