बुलढाणा : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी आज रविवारी मतदान घेण्यात येत आहे. पहिल्या २ तासांच्या टप्प्यात जेमतेम १२.३७ टक्केच मतदानाची नोंद झाली आहे. तब्बल १५ वर्षानंतर होणाऱ्या बाजार समिती निवडणुकीत अजित पवार गटाचे नेते आमदार राजेंद्र शिंगणे विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. राजकीय चित्र बदलल्याने माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार शशीकांत खेडेकर हे एकत्र आले आहे. यामुळे आघाडी नेतृत्वहीन असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : पर्यटनासाठी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू; यवतमाळच्या जेतवनमधील घटना
आघाडीला केवळ १० जागीच उमेदवार मिळाले. यामुळे येथील निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८ वाजता १८ संचालक पदासाठी ५ केंद्रांवरून मतदानाला सुरुवात झाली. सहायक निबंधक श्रीमती एस बी शितोळे यांनी मतदानाचे सुसज्ज नियोजन केले. आठ ते दहा या पहिल्या टप्प्यात केवळ ८. ५७ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातही( १० ते १२) दरम्यान मतदारांची उदासीनता कायम राहिली. यामुळे जेमतेम १२.३७ टक्के मतदानाची नोंद झाली. यामुळे कमी मतदानाची चिन्हे आहेत.