नागपूर: धिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात वरिष्ठ सभागृहात (विधान परिषद) वादळी झाली. सीमावाद्यावर बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले असता उपसभापतींनी विरोधी बाकावरील सदस्याला बोलण्याची संधी दिल्याने मंत्री चंद्रकांतदादा पाटील संतप्त झाले, ठरल्या प्रमाणे कामकाज होणार नसेल तर आम्ही सभागृहात येणार नाही, तुम्ही चुमच्या मनाने कामकाज चालवा,असा इशाराच त्यांनी उपसभापतींना दिला.

विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात होताच कर्नाटक सीमावादाच्या घोषणा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिल्या. त्यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र सरकार सीमावासीयांच्या पाठीशी आहे, असा विश्वास सरकारने या सभागृहाच्या माध्यमातून द्यावा,अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन करण्यास उठले असता विरोधी बाकावरून राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यांना परवानगी देऊ नका, अन्यथा आम्ही सुद्धा बोलू,असे सांगितले. त्यानंतर खडसे बोलण्यासाठी उभे राहताच सत्ताधारी बाकावरून मंत्री चंद्रकात पाटील यांनी आक्षेप घेतला.

हेही वाचा: ५० खोके, माजले बोके….ईडी सरकार हाय हाय!; विधान भवनाच्या पायरीवर विरोधकांची निदर्शने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठरल्याप्रमाणे या विषयावर फक्त विरोधीपक्ष नेतेच या मुद्यावर बोलणार होते. पण आपण (उपसभापती) इतर दोघांना बोलण्याची परवानगी दिली आता. आता उपमुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले असताना खडसे बोलणार असेल तर बरोबर नाही. ठरल्याप्रमाणे वागणार नसेल तर आम्ही सभागृहात येणार नाही, तुम्हाला वाटेल तसे कामकाज चालवा,असे चंद्रकांतदादा म्हणाले. त्यानंतर उपसभापतींनी खडसे यांना बोलण्यास परवानगी नाकारली व सभागृहातील तणाव संपुष्टात आला.