चंद्रपूर : अंगणवाडी सेविका पदभरती अर्जासोबत एम. ए. अंतिम वर्षाची बनावट गुणपत्रिका जोडल्याप्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शीला महेंद्र गेडाम तथा लिपिक प्रशांत देवराव खामनकर या दोघांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नागभीड पोलीसांनी केले दुध को दुध, पाणी का पाणी एक महीला अधिकारी व लिपीक पुरूष आरोपीला अटक केल्याने चांगलाच धक्का बसला आहे.

पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रारदार बालविकास प्रकल अधिकारी श्रीमती शिला महेंद्र गेडाम, नागभीड यांनी १६ सप्टेंबर रोजी तक्रार दिली की, आरोपी सौ. करिश्मा आशिष मेश्राम (२९) रा. पळसगाव खुर्द हीने अंगणवाडी सेविका पदभरतीचे अर्जासोबत एम.ए. (MA) अंतिम वर्षाची बनावट गुणपत्रिका सादर करून ती खरी म्हणुन वापरून शासनाची फसवणुक केली. या प्रकरणी श्रीमती मेश्राम हिचे विरूध्द पो.स्टे. नागभीड येथे अप क्रं.336/2025 कलम 318(4), 336(3), 340(2) भा.न्या.सं. अन्वये नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी स.पो.नी. किशोरकुमार वैरागडे यांनी नागभीडचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे पो.स्ट यांचे मार्गदर्शनात आरोपी सौ. करिश्मा आशिष मेश्राम हिचे सोबत नागभीड येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शिला महेंद्र गेडाम व लिपिक प्रशांत देवराव खामणकर यांचा या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून सदर गुन्हयात कलम 61(2) भा.न्या.सं. वाढ करून बालविकास प्रकल्प अधिकारी शिला महेंद्र गेडाम, नागभीड व प्रशांत लिपिक देवराव खामणकर, लिपीक, कार्यालय बालविकास प्रकल्प अधिकारी, नागभीड यांना अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी मा. पो. अ. मम्मुका सुदर्शन , अपर पो. अ. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनात स.पो.नी. किशोरकुमार वैरागडे, पो.अं. विक्रम आत्राम, पो.अं. गायकवाड यांनी कौशल्यपुर्वक मार्गाने तपासाचे धागेदोरे जोडत फसवणुक करणाऱ्या महीला व पुरुष आरोपीच्या आवळल्या मुसक्या.