नागपूर : मराठा आरक्षणबाबत जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ते ४० वर्ष सरकार चालवणाऱ्यांना जमले नाही. फडणवीस यांनी न्याय देण्याचा प्रयत्न तरी केला. त्यामुळे शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ते नागपुरात बोलत होते. ओबीसी आरक्षणावर शरद पवार यांना प्रश्न विचारले पाहिजे. संपूर्ण बाबीचे विश्लेषण करून मराठा समाजाला आरक्षण दिले होते आणि ते पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर झाले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पूर्व इतिहास तपासला पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>>वर्धा: बैलजोड़ी धुण्यासाठी गेले अन् पाण्यात बुडाले, पोळ्याच्या धामधुमीत बापलेकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग देऊन आरक्षण दिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यादृष्टीने पाऊले उचलली आहे, आरक्षण मिळेल असे वाटते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावणार ही भूमिका घेतली आहे. सर्वपक्षीय वैठकीत ही भूमिका मांडली होती. त्यामुळे ओबीसी संघटनांनी समजून घेण्याची गरज आहे. बीसींवर अन्याय होणार नाही. सर्व पक्षीय बैठकीत सर्वच लोकांनी ओबीसींवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरलं होते. सरकारने सर्वपक्षीय भूमिका मान्य केली. त्यामुळे ओबीसी समाजाला भीतीचे कारण नाही, असेही बावनकुळे महणाले.