नागपूर : चित्त्यांच्या व्यवस्थापनातील हयगय एका नव्या संघर्षाची नांदी ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती आणि ती आता खरी ठरू पहात आहे. कुनोतील ‘ओबान’ या चित्त्याने उद्यानाबाहेर गावाचा रस्ता धरल्याने मानव-चित्ता संघर्षाची नांदी तर नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा… ‘माळढोक’ने पार केला मैलाचा दगड; जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात दोन पिल्लांचा जन्म

हेही वाचा… गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या, टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पहिल्या तुकडीत आठ आणि दुसऱ्या तुकडीत बारा, असे वीस चित्ते सोडण्यात आले. मात्र, वीस चित्ते सामावून घेण्याइतपत कुनोचे जंगल नाही आणि चित्त्यांसाठी पुरेशी शिकारही नाही. त्यामुळे राजस्थानमधील मुकुंद्रा अभयारण्याचा प्रस्ताव चित्ता प्रकल्पाचे प्रमुख डॉ. यजुवेंद्रदेव झाला यांनी दिला होता. मात्र, दोन राज्यातील वेगवेगळ्या पक्षाचे सरकार आणि चित्ता प्रकल्पाच्या श्रेयात चित्त्याच्या संरक्षण आणि संवर्धनाऐवजी डॉ. झाला यांनाच प्रकल्पातून बाजूला सारण्यात आले. त्यांनी व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली असून चित्त्याने उद्यानापासून दूर सुमारे २० किलोमीटर अंतरावरील झार बडोदा गावातील शेतात मुक्काम हलवला आहे. या प्रकारामुळे चित्त्याला लावलेल्या कॉलरवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. ‘ओबान’ हा चित्ता गावाकडे जाताना दिसत होता, तर तेव्हाच त्याला का रोखले नाही, तो गावात पोहोचल्यानंतर निरिक्षण पथक गावात दाखल झाले. मात्र, येथून चित्त्याला कुनोत परत आणणे शक्य होईल का, याबाबत शंका आहे.