नागपूर : राज्यात २०२०-२१ या वर्षात बुब्बुळ (नेत्र) प्रत्यारोपणाची संख्या ८४७ होती. २०२२-२३ मध्ये ही संख्या सुमारे तिप्पट झाली. यंदाच्या एकूण प्रत्यारोपणात ३७ टक्के प्रत्यारोपण हे केवळ मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांत झाले. आज १० जूनला जागतिक नेत्रदान दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

केंद्र व राज्य शासनाकडून नेत्रदान व नेत्र प्रत्यारोपण वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतात. दिशा समुहासह इतरही अनेक स्वयंसेवी संस्था या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतात. राज्यात २०१९-२० मध्ये विविध नेत्रपेढींना ६ हजार ६५३ बुब्बुळ (नेत्र) मिळाले. त्यापैकी ३ हजार ५९ रुग्णांवर बुब्बुळ प्रत्यारोपण करण्यात आले.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

हेही वाचा – अमरावती: दुचाकीचा स्‍फोट झाल्‍याने शेतकऱ्याचा मृत्‍यू

२०२०-२१ मध्ये करोनामुळे नेत्रपेढींना केवळ १ हजार ३५५ बुब्बुळ मिळाले. त्यातून ८४७ रुग्णांवर बुब्बुळ प्रत्यारोपण झाले. २०२१-२२ मध्ये ३ हजार १७२ बुब्बुळ मिळाले व त्यातून १ हजार ९४७ रुग्णांवर प्रत्यारोपण झाले. २०२२-२३ मध्ये ४ हजार ४५६ बुब्बुळ मिळाले. त्यातून २ हजार ४७७ रुग्णांवर प्रत्यारोपण झाले. २०२२-२३ मध्ये झालेल्या एकूण प्रत्यारोपणापैकी मुंबईत १५०, पुणे ६४६, नागपुरातील केंद्रात १३५ असे एकूण ३७ टक्के म्हणजे ९३१ प्रत्यारोपण झाले. इतर प्रत्यारोपण विविध शहर-जिल्ह्यांमधील केंद्रात झाल्याची माहिती आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाने दिली.

“करोनानंतर बुब्बुळ प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. परंतु समाजाने आणखी पुढाकार घेतल्यास मोठ्या संख्येने अंध बांधवांना नवीन दृष्टी मिळू शकेल.” – स्वप्निल गावंडे, संचालक, आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया.

हेही वाचा – भीम जयंती साजरी केली म्हणून अक्षयचा खून, हे राज्य दलितांचे नाही का? डॉ. नितीन राऊत यांचा संताप, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

‘सीडीएसएम’ पोर्टल वापराविनाच बंद!

नेत्रदान चळवळीत पारदर्शकता आणण्यासाठी काॅर्निया डिस्ट्रिब्युशन सिस्टम इन महाराष्ट्र, इंडिया (सीडीएसएम) हे पोर्टल २०१६-१७ मध्ये सुरू करण्यात आले. परंतु देखभाल-दुरुस्तीसाठीच्या खर्चावरून ते विनावापरच बंद पडले आहे. या पोर्टलवर राज्यातील सर्व नेत्रपेढींची सक्तीची नोंदणी, भविष्यात होणारे प्रत्येक नेत्रदान व प्रत्यारोपणाची माहिती टाकण्याचेही बंधनकारक करण्यात येणार होते. पोर्टलमुळे नेत्रदानाची प्रक्रिया सुलभ होणे अपेक्षित होते. प्रात्यक्षिक सुरूही झाले होते. परंतु पोर्टलच्या भविष्यातील देखभाल-दुरुस्तीचा खर्च देणार कोण, हा प्रश्न उद्भवल्यावर दुसऱ्याच वर्षी ते विनावापर बंद पडले. दरम्यान, केंद्राच्या महाअवयवदान पोर्टलवर नेत्रदानासह या व्यवस्थेशी संबंधित सर्व नोंदी सुरू आहेत. त्यामुळे नेत्रदान वाढून राष्ट्रीय स्तरावर सर्व माहिती एकत्रित होत असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी दिली आहे.