लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिन आज १ मे २०२४ रोजी राज्यभर साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी सकाळी ८.०० वाजता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नागपुरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथे होणार आहे.

भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तर गोंदिया येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू, वेळेवर उपचार न झाल्याने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते तर वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.