नागपूर : भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा आहे. पुढील सहा आठवड्यानंतर तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया शक्य आहे. त्यामुळे आता  तिला या कालावधीत रुग्णालयातून सुट्टी देण्याबाबत शासकीय वैद्यकीय रूग्णालय (मेडिकल) प्रशासन वरिष्ठ पोलिसांसोबत पत्रव्यवहार करणार आहे.

हेही वाचा >>> खळबळजनक…बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन महिलांनी मागितली खंडणी

पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा असून शरीराच्या बहुतांश अवयवांनी पूर्वीप्रमाणे काम करणे सुरू केले. ती आता इतरांशी संवाद साधून स्वत:चा त्रासही सांगत आहे. तिच्या प्रकृतीतील सुधारणा बघत काही दिवसांपूर्वी मेडिकलच्या डॉक्टरांकडून तिला बेशुद्ध करून काही अंतर्गत तपासणी केली गेली. यावेळी तिच्यावर दुसरी मोठी शस्त्रक्रिया (रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि पेरिनीअर टिअर रिपेअर) सुमारे सहा आठवड्यांनी शक्य असल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : आंबटशौकीन वृद्ध डॉक्टरला अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ पडला १६ लाखांचा ; तरुणीने दिली छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी

दरम्यान, रुग्णाची प्रकृती चांगली असल्याने आता सहा आठवडे तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्याबाबत फारसे काही नाही. उलट ती या काळात घरात राहिल्यास चांगल्या वातावरणात आणखी तिच्या प्रकृतीत सुधारणा शक्य आहे. त्यामुळे मेडिकल प्रशासनाकडून तिला रुग्णालयातून सुट्टी देण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शासनालाही पत्र लिहले जाणार आहे. त्यांच्या उत्तरानंतरच पीडितेवरील पुढील निर्णय घेतला जाईल, असे माहिती सूत्रांनी दिली. या वृत्ताला मेडिकलच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

पुन्हा काही शस्त्रक्रियांची गरज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भंडारा जिल्ह्यात या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर तिला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर तातडीने एक मोठी शस्त्रक्रिया झाली. आता पुन्हा काही शस्त्रक्रियांची गरज पडू शकते, अशी शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.