नागपूर: राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे नागपुरात धंतोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी ढोल ताशाच्या निनादात जल्लोष केला. यावेळी फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली.

महिलांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. लोकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके ,कृष्णा खोपड़े ,विकास कुंभारे या भाजपचे नेत्यांसहअनेक पदाधिकारी या विजय उत्सवात सहभागी झाले होते.

हेही वाचा… बनावट नोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची यवतमाळात कारवाई; आर्णी तालुक्यातून संशयितास ताब्यात घेतले

तीनही राज्यात मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली.

Story img Loader