गोंदिया : गोंदिया जिल्हा छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. छत्तीसगड मधील डोंगरगड हे माँ बमलेश्वरी मंदिर आहे, जिथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. येथे छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक माँ बामलेश्वरीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. गोंदिया जिल्ह्यातील भाविक देखील रेल्वेने डोंगरगडला जातात. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने प्रवासी गाड्या वाढवण्यात आल्या आहे.

डोंगरगड आणि रायपूरसाठी काही गाड्या तात्पुरत्या वाढवण्यासोबतच, काही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान डोंगरगड येथे तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. यामध्ये गोंदिया-दुर्ग-गोंदिया मेमू पॅसेंजर चा समावेश आहे. ही पॅसेंजर ट्रेन रायपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रायपूर-डोंगरगड – रायपूर मेमू पॅसेंजर क्रमांक गोंदिया स्टेशनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

डोंगरगड-दुर्ग-डोंगरगड मेमू पॅसेंजर विशेष ट्रेन चालवण्यात येत आहे. या सह मुंबई – हावडा या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बिलासपूर – भगत की कोठी एक्सप्रेस, भगत की कोठी – बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर – बिकानेर एक्सप्रेस,बिकानेर – बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर – चेन्नई एक्सप्रेस, चेन्नई – बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर – पुणे एक्सप्रेस, पुणे बिलासपूर एक्सप्रेस, रायपूर – सिकंदराबाद एक्सप्रेस, सिकंदराबाद – रायपूर एक्सप्रेस सर्वच एक्सप्रेस ट्रेन यांचा नवरात्रोत्सवासाठी भाविकांच्या सोईकरिता २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत २ मिनिटाचा तात्पुरता थांबा देण्यात आला असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे.

अमृत भारत एक्सप्रेस गोंदिया स्टेशन वरून जाणार

रायपूर आणि गोंदिया स्टेशनवरून जाणारी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही ट्रेन बिलासपूरमधून जाणार नाही आणि त्यामुळे बिलासपूरमध्ये थांबणार नाही. गुजरातच्या आसपासच्या राज्यांमधून घरी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी हे वरदान ठरेल. भारतीय रेल्वेने ब्रह्मपूर (ओरिसा) आणि उधना (गुजरात) दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन ओडिशा ते गुजरात थेट आणि जलद रेल्वे सेवा प्रदान करेल, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. ही ट्रेन पूर्व, मध्य आणि पश्चिम भारतातील महत्त्वाचे जिल्हे आणि शहरे जोडेल. ही ट्रेन आधुनिक एलएचबी कोचने सुसज्ज असेल, ज्यामुळे आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि उत्तम सुविधा मिळतील.

ही ट्रेन कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आहे. ही गाडी रायगड, विजयनगरम, नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, जळगाव, भुसावळ, पलासा, बडनेरा, रायपूर आणि तितलागड यासह अनेक प्रमुख स्थानकांवर थांबेल. रेल्वेने अद्याप या गाडीच्या लाँचिंगची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु पंतप्रधान मोदी २७ सप्टेंबर रोजी ओडिशा दौऱ्यादरम्यान तिला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन अंदाजे १६० ते १८० किमी/ताशी वेगाने धावेल. यात एकूण २३ कोच असतील, ज्यामध्ये ११ जनरल क्लास, ८ स्लीपर क्लास, १ पॅन्ट्री कार आणि २ सेकंड क्लास कोच असतील. एक कोच अपंग प्रवाशांसाठी राखीव असेल.