नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभांपैकी सावनेर क्षेत्र माजी मंत्री सुनील केदारांमुळे सर्वात मागास राहिला. केदारांनी या भागात केवळ रेती चोरी आणि अवैध व्यवसायातून लोकांना रोजगार दिला. चांगल्या घरातील मुलींचे जीवन खराब करण्याचे काम केले. पोलिसांनाही या भागात प्रचंड त्रास आहे. सावनेरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची येथील अवैध व्यवसायाला साथ दिली. येथे विकासाचे नाही तर केवळ दादागिरीचे राजकारण चालते अशी टीका करत सावनेरचा खरा विकास करायचा असेल तर परिवर्तन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज (१८ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. भारतीय जनता पार्टीने त्यांचे देशभरातील स्टार प्रचारक या निवडणुकीत भाजपा व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरवले होते. बॉलिवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणौत या देखील भाजपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसल्या.

हेही वाचा…फडणवीसांचा ‘चौकार’ की काँग्रसचे ‘परिवर्तन पर्व’ ?

सावनेर विधानसभेचे भाजपचे उमेदवार डाॅ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, केदारांनी इतके वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करूनही सावनेर मागास राहिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी या जिल्ह्यात अनेक विकास कामे केली. सावनेरमध्ये विकासाचे नाही तर केवळ दारागिरीचे राजकारण चालते. महाराष्ट्रातील ज्या भागात जिल्हा बँक जिवंत आहेत तेथील शेतकाऱ्यांना आताही बिनव्याजी कर्ज मिळते. मात्र, कौट्यवधींचा भ्रष्टाचार केल्यामुळे आमच्याकडची जिल्हा बँक बुडाली आणि तिच्यासोबत येथील शेतकऱ्यांचे स्वप्नही मेली. या जिल्ह्यातील कृषी आधारित अर्थव्यवस्था संपली. आमच्या आंदोलनामुळे आज घोटाळा करणाऱ्या केदारांना शिक्षा झाली आहे. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी परिवर्तन करून डॉ. आशिष देशमुख यांना निवडून द्या. तुम्ही आमदार निवडून दिला तर मी तुम्हाला मंत्री देतो असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा…जय भीम म्हटल्याने ‘या’ नेत्याची मंत्रीपदाची संधी हुकली ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामटेकचे खासदार ‘रबर स्टॅम्प’

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे ‘रबर स्टॅम्प’ आहेत. सर्व कामे ही सुनील केदारच बघतात. आता ते सहा वर्षांसाठी अपात्र असल्याने पत्नीला विधानसभा निवडणुकीत उतरवले. मात्र, त्या निवडून आल्या तर आमदार केदारच राहणार. त्यामुळे यांचे दहशतीचे राजकारण संपण्याची वेळ आली आहे. कुणालाही न घाबरता परिवर्तन करा, असेही फडणवीस म्हणाले.