४० लाखांची शिष्यवृत्ती मंजूर

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा रेगुंठा येथील ‘लेडी ड्रायव्हर’ किरण कुरमावर हिचे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने किरणला ४० लाखांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड येथील लीड्स विद्यापीठात किरण प्रवेश घेणार आहे.

हेही वाचा >>> केक कापून चक्क खड्ड्यांचा वाढदिवस; स्वराज्य संघटनेकडून निषेध आंदोलन

राज्याच्या एका टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा ते सिरोंचापर्यंत ‘टॅक्सी’ चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या किरण कुरमावार हिला उच्च शिक्षणासाठी समाज कल्याण विभागाने  ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंडमधील प्रसिद्ध अशा लीड्स विद्यापीठात ‘इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा : संग्रामपूरमध्ये शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, संयमाचा बांध फुटला

किरण हिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी काही काळ  रेगुंठा ते सिरोंचा दरम्यान प्रवासी वाहन चालविण्यास सुरुवात केली. पुढे हा व्यवसाय वाढवून तिने तीन प्रवासी वाहन खरेदी केले. पण विदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. यासाठी तिने वर्षभरापासून प्रयत्न चालविले होते. यात तिला इंग्लंड येथील प्रसिद्ध अशा लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला. परंतु यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ तिच्याकडे नव्हते. माध्यमांनी हा विषय लाऊन धरल्यानंतर काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले. शिंदेंनी देखील तत्परता दाखवीत संबंधितांना तसे निर्देश दिले. यामुळे लवकरच किरणला ४० लाखांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. मनात जिद्द असल्यास गडचिरोली जिल्ह्यातील रेंगुंठा सारख्या दुर्गम भागातील मुलगी देखील विदेशात शिक्षण घेऊ शकते, हे किरणने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. किरणच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलैपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे माझ्यापुढे आव्हान होते. परंतु काही मित्रांच्या मार्गदर्शनात मी प्रयत्न चालू ठेवले. अखेर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा केला. मी १८ सप्टेंबरपर्यंत लीड्स येथे जाणार आहे. – किरण कुरमावार