लोकसत्ता टीम
बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव येथील एका सामान्य कुटुंबातील सदस्य आणि फॅशन क्षेत्र व मॉडेलिंग क्षेत्राचा गंधही नसतांना शेगाव येथील गायत्री रोहणकार हिने राजधानी दिल्लीत स्वतःसह जिल्ह्याचा डंका वाजविला. गायत्रीने राजधानी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट ‘रॅम्प वॉक’ करुन उपस्थिताना थक्क केले. सोबतच ‘फॅशन आयकॉन-२०२३’ पुरस्कार पटकावला.
गायत्री रोहणकर यांनी अल्पावधीतच जिद्द, चिकाटी, स्वभ्यास व मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. नुकतेच वसुंधरा गाझियाबाद (दिल्ली) च्या रॉयल पॅलेसमध्ये एक स्पर्धा पार पडली. यावेळी मनमोहक ‘रॅम्प वॉक’ करून अन्य स्पर्धकांवर मात केली. स्टायलिश फॅशन आयकॉन्स पुरस्कार – २०२३ ने त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे शेगाव सह बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.