नागपूर : नागपूरसह देशभरात १९ जुलैला सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेटसाठी ६० हजार रुपयांवर गेले होते. त्यानंतर पुन्हा हे दर कमी झाले. गेल्या आठवड्याभरातील दर बघितल्यास गुरुवारी दुपारी १.४२ वाजता नागपुरात सोन्याचे दर प्रती दहा ग्राम ५९ हजार ३०० रुपये असे निच्चांकी नोंदवले गेले.

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार १९ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार १०० रुपये होते. हे दर ४ ऑगस्टला प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ८०० रुपये होते.

हेही वाचा – “गुन्हेगारीवर नियंत्रण अन् शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही उत्तम!” काय आहे वाशीम पोलिसांचा अभिनव उपक्रम, जाणून घ्या…

हेही वाचा – सावधान! चंद्रपूर-गडचिरोलीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय, दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० ऑगस्ट २०२३ रोजी (गुरुवारी) नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. दरम्यान सध्या दर कमी झाले असले तरी भविष्यात हे दर वाढण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवले.