मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने देशभरातील अभिमत विद्यापीठाच्य कुलगुरूंची गोलमेज परिषद घेत नवाच पायंडा पाडला.ही धनवंत मंडळींची शिक्षण केंद्रं म्हणून परिचित.पण या ठिकाणी सर्वांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध व्हावी असा काळजीयुक्त स्वर उमटला.विशेष म्हणजे उपस्थित कुलगुरत मराठी जणांचा लक्षणीय सहभाग लाभला.

हेही वाचा >>>चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना; जय श्रीरामचा जयघोष, भव्य शोभायात्रा व मिरवणूक

या गोलमेज परिषदेत चेन्नईच्या एमजीआर विद्यापीठाच्या डॉ.गीतालक्ष्मी,चंदीगडचे डॉ.आनंद अग्रवाल, बेळगावच्या के एल ई चे डॉ नितीन गगने, डी वाय पाटीलचे डॉ.एन जे पवार, भारतीचे डॉ विवेक सावजी,कृष्णा कराड डॉ नीलम मिश्रा,फगवरा पंजाबच्या लव्हली येथील डॉ प्रीती बजाज (मूळ वर्धा ) , जयपुरचे डॉ.संजीव शर्मा, सिंबोयसिसचे डॉ.राजीव येरवडेकर, मुंबई एमजीएम्चे डॉ.शशांक दळवी, मलेशियातील लिंकन विद्यापीठाचे डॉ संजीव पोड्डार व अन्य विद्यापीठाचे निमंत्रित उपस्थित होते.आयोजक मेघे विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. वेद प्रकाश मिश्रा यांनी शिक्षणाच्या एकजिनसीकरणाची गरज व्यक्त केली.नव्या शैक्षणिक धोरणाबाबत मते व्यक्त झाली.कुलगुरू डॉ.ललित वाघमारे,कुलसचिव डॉ श्वेता काळे,डॉ तृप्ती वाघमारे यांनीही चर्चेत भाग घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.