चंद्रपूर : सावली पोलीस ठण्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस दूरक्षेत्र व्याहाड (खुर्द) हद्दीतील मौजा उपरी येथील रहिवासी आकाश राजेंद्र येनप्रेडीवार (२७) याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे असे लिहून ठेवले. तिला माहेरी सुखरूप जाऊ द्या, असेही त्यात सांगितले.

याच वर्षी मे महिन्यात आकाश याचा अहेरी येथील खुशबू नामक युवतीबरोबर विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. दिवसेंदिवस वाद वाढत गेल्याने अखेर आकाशने गुरुवारी रात्री मोठा भाऊ याला व्हॉट्सअ‍ॅपवर मी आत्महत्या करीत आहे. घराजवळील झाडाला प्रेत लटकले आहे, असा संदेश दिला. एवढेच नव्हे तर मी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून ठेवले असून तो पेपर बेडमध्ये आहे, असे सांगितले. लगेच कुटुंबीयांनी व शेजाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. पत्नीला सुखरूप माहेरी जाऊ द्या असेही यात लिहिले आहे.

हेही वाचा – शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे…

हेही वाचा – चंद्रपूर : बंदुकबाज जेरबंद, गणेशोत्सवात दुसरी कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंभर रुपयांच्या पेपरवर माहिती लिहून ठेवली होती, तो पेपर पोलिसांना देण्यात आला. यात मृतकाने माझी पत्नी खुशबू हिच्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला खूप त्रास आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. मात्र, या प्रकरणात खुशबूला काहीही न करता तिच्या माहेरी अहेरी येथे सुखरूप सोडून द्यावे, असे लिहून ठेवले आहे. पुढील तपास सावलीचे ठाणेदार बोरकर करीत आहेत.