नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा निकाल २० जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेस अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. 

-आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ मधील Retotaling of Marks या लिंकवर क्लिक करावे.

– उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.

– परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.

–  फेरपडताळणी संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.

– उपलब्ध होणाच्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या एक किंवा जास्त विषयाची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करावे.

– गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक ३ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.