नागपूर : मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभाग असलेल्या वार्ड क्रमांक ५२ मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वार्ड क्रमांक ५२ मध्ये आपत्कालीन स्थितीत डायलेसिस आणि अत्यवस्थ रुग्णांना दाखल केले जाते. वार्डाच्या बाहेर नातेवाईक बसले असतात. शुक्रवारी दुपारी येथे एक अत्यवस्थ रुग्णाला दाखल केले गेले. त्याच्यासोबत सुमारे १५ ते २० नातेवाईक आले.

हेही वाचा – चंद्रपूर : २१६ संचालकपदांसाठी ४७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नातेवाईकांनी रुग्णाला बघण्याच्या नावावर वार्डात शिरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने त्यांना रोखले. एका नातेवाईकाने सुरक्षा रक्षकावर हात उगारला. यामुळे तणाव निर्माण झाला. या विषयावर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना संयम पाळण्याचे आवाहन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In a medical hospital in nagpur relatives of the patient assaulted the private security guard mnb 82 ssb
First published on: 22-04-2023 at 10:30 IST