लोकसत्ता टीम

नागपूर : मुंबईतील दोन फलाटांचा विस्तार करण्यासाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येत आहे. यामुळे पुढील आठवड्यात नागपूर -मुंबई दुरान्तोसह अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १० व ११ च्या विस्तारीकरणासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंगचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या दोन्ही फलाटावर सध्या २२ डब्यांची गाडी उभी राहते. ही क्षमता वाढवून २४ डब्यांची केली जाणार आहे. त्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. नागपूर- मुंबई-नागपूर दुरान्तो एक्स्प्रेस दोन दिवस रद्द करण्यात आली आहे.

आणखी वाचा-बुलढाणा : नागरी क्षेत्रातही पाणीटंचाईची चिन्हे, धरणे तहानली

३१ मे रोजी नागपूर-सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस आणि १ जूनला सीएसएमटी -नागपूर दुरान्तो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई- गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस १ जूनला दादर स्थानकावरून सोडण्यात येईल. सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस सीएसएमटी-गोंदिया सेवाग्राम एक्स्प्रेस १ व २ जूनला नाशिक स्थानकावरून सोडण्यात येईल. मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १ व २ जूनला नाशिक स्थानकावरून सोडण्यात येईल.

२७ व ३० मे रोजी नागपूर – मुंबई विशेष गाडी, ३१ मे व १ जूनला गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस तसेच ३१ मे व १ जूनला गोंदिया – मुंबई विदर्भ एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत जाईल. ३१ मे व १ जूनला नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक स्थानकापर्यंत जाईल.

आणखी वाचा-तिघांना चिरडणाऱ्या चालकाने घेतला होता गांजा

३१ मे ते २ जूनपर्यंत ‘या’ गाड्या रद्द

३१ मे २०२४ रोजी अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस, हावडा- सीएसएमटी दुरान्तो एक्स्प्रेस, नांदेड -सीएसएमटी राज्य राणी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे.

१ जून २०२४ रोजी पुणे- सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात येत आहे.

आणखी वाचा-Video: वाघिणीचा चार बछड्यांसह जलविहार; नवेगाव-नागझिऱ्यातील या व्हिडिओने लावले वेड

२ जून २०२४ रोजी पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड तपोवन एक्स्प्रेस), सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी- पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात येत आहेत.