बुलढाणा : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ८९.४३ टक्के मतदान झाले. सकाळी ८ वाजता ५ केंद्रावरून मतदानाला सुरुवात झाली. सहायक निबंधक श्रीमती एस बी शितोळे यांनी १४५७ मतदारांच्या मतदानासाठी सुसज्ज नियोजन केले. पहिल्या आठ ते दहा टप्प्यात केवळ ८.५७ टक्के (१२४) मतदान झाले.
हेही वाचा : सरसंघचालक मोहन भागवत गजानन महाराज चरणी नतमस्तक; कडक सुरक्षेत विविध स्थळांचे दर्शन
दुसऱ्या टप्प्यातही (१० ते १२ वाजेपर्यंत) मतदारांची उदासीनता कायम राहिली. या मुदतीत ५४४ (३७ टक्के) मतदारांनी मतदान केले. मात्र यानंतर मतदानाने गती घेतली. २ वाजेपर्यंत टक्केवारी ७६ वर पोहोचली. ११०६ जणांनी मतदान केले. अंतिम दोन तासात हा आकडा ८९.४३ टक्क्यांवर गेला. बाजार समितीत महायुतीला विजयाची जास्त संधी असल्याचे चर्चा मतदानानंतर आहे.