चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे लावून ओबीसी आंदोलकांनी आज येथे मुंडन आंदोलन केले. यावेळी मराठ्यांचे लांगूलचालन करणाऱ्या व ओबीसींना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकार जाणीवपूर्वक ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत नाही. ओबीसी विदयार्थ्यांच्या योजनेसाठी सरकारकडे निधी नाही. आमच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाहीत, असे म्हणत आंदोलकांनी आज ओबीसी समाजाचे रवींद्र टोंगे यांच्या उपोषण स्थळी जाऊन समर्थ संकल्पनेतून मुंडण आंदोलन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री यांचा निषेध व्यक्त केला.

हेही वाचा : गडचिरोली : “हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारा”, भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी स्वतः चे मुंडण करत निषेध व्यक्त केला. आंदोलनस्थळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया, ॲड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते. अन्नत्याग उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने ओबीसी युवकाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम उमटतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी दिला आहे.