चंद्रपूर : भद्रावतीची कन्या व इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस आणि टेकनोलॉजी तिरुअनंतपुरम, केरळ येथे पीएचडी करत असलेली कोमल भारत गायकवाड हिने युनिव्हर्सिटीत झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना ‘जी २०’ च्या यशस्वीतेसाठी अभिनंदन करून “सबका साथ सबका विकास” बद्दल येणारी समस्या व आफ्रिकन देशसोबत तुलना यावर काही प्रश्न विचारून त्यांची शाबासकी मिळविली.

हेही वाचा : चंद्रपूर : विजेच्या धक्क्याने दोन शेतकरी ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोमलचे वडील भारत गायकवाड हे तालुक्यात केंद्र प्रमुख पदावर कार्यरत असून आई रेखा गायकवाड जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. तिने विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणे उत्तरे देताना विदेशमंत्री भारावून गेले व कोमलची प्रशंसा केली. विशेष म्हणजे कोमलच्या भावाची फ्रांस येथे न्यूरोलॉजिस्टमध्ये रीसर्च पर्सन म्हणून नुकतीच निवड झाली आहे.