नागपूर: नवरात्रीनंतर सातत्याने सोन्याच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. त्यामुळे सध्या सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी उंचीवर आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने ग्राहकांची चिंता वाढवली असतांनाच मंगळवारी (२२ ऑक्टोंबर) सराफा बाजार उघडल्यावर एक सुवर्णवार्ता पुढे आली आहे. त्यानुसार आठवड्याभरात प्रथमच सोन्याचे दर किंचीत कमी झाले आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरात दिवाळीच्या तोंडावर २१ ऑक्टोंबरला बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७८ हजार ४०० रुपये प्रति दहा ग्राम होते. परंतु रात्री बाजार बंद होताना हे दर वाढून ७८ हजार ६०० रुपयापर्यंत विक्रमी उंचीवर गेले. परंतु दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (२२ ऑक्टोंबर) सराफा बाजार उघडल्यावर सकाळी ११ वाजता सोन्याच्या दरात आठवड्याभरात प्रथमच किंचित घट झाली. त्यामुळे दर ७८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले.

हे ही वाचा… प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल

दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. परंतु सोन्याच्या दर उंचीवर असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. नागपुरातील सराफा बाजारात २१ ऑक्टोबरला रात्री बाजार बंद होतांना सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार १०० रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दरही २१ ऑक्टोबरला रात्री ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले.

परंतु २२ ऑक्टोंबरला बाजार उघडल्यावर मात्र सोन्याच्या दरात किंचित घट झाली. त्यामुळे सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये नोंदवले गेले. दरम्यान सोन्याचे दर वाढले असले तरी पुढे हे दर आणखी वाढणार असल्याने आता सोने- चांदीच्या धातूत गुंतवणूक लाभदायक असल्याचा दावा नागपुरातील सराफा व्यवसायिक करत आहे.

हे ही वाचा… नागपूर: ‘नो राईट टर्न’मुळे नागपूरकर हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीचे दर स्थिर…

दिवाळीच्या तोंडावर नागपुरातील सराफा बाजारात २१ ऑक्टोबरला (सोमवारी) रात्री बाजार बंद होतांना चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आले होते. परंतु हे दर दुसऱ्या दिवशी सराफा बाजार उघडल्यावर सकाळी ११ वाजता ९८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात बदल झालेले दिसत नाही.