नागपूर : काँग्रेसमध्ये परिवारवाद, जातीवाद आणि तृष्टीकरण असे राजकारण केले जात आहे त्यामुळे देशातील जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक नाही. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यासह जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

अनुराग ठाकूर नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशात सगळीकडे भाजपमय वातावरण आहे. लोकांना माहित आहे की आम्ही इमानदारीने काम करत आहे. गरीब कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून लोकांचा विकास होतो हे मागील दहा वर्षात लोकांनी पाहिले आहे. त्या तुलनेत काँग्रेसने देशाचे नुकसान केले आहे.

हेही वाचा…पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग

जनता जेव्हा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी तुलना करतात तेव्हा त्यांना स्पष्ट दिसते की भाजपने गरिबांचे कल्याण आणि देशाच विकास केला आहे तर दुसरीकडे काँग्रेसने केवळ परिवार, जातीवाद केला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये जनतेसमोर गेलो तेव्हा लोकांनी आम्हाला संपूर्ण बहुमत दिले आणि आणि २०२४ मध्ये ४०० पार जागा येणार आहे असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून केवळ राजकारण आणि टीका केली जाते मात्र आम्ही सेवाभाव करण्याची गोष्ट करतो. उद्धव ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर फार काळ टिकणार नाही अशी टीका ठाकूर यांनी केली.

हेही वाचा…“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……

काँग्रेसकडे जेव्हा काही बोलण्यासाठी नसते त्यावेळी भविष्यासाठी त्यांच्याकडे विचार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदा नाही तर अनेक वेळा काँग्रेसने अपमान करून त्यांना पक्षाच्या बाहेर काढले आहे. त्यांनी निवडणुकी पराभूत केले होते. काँग्रेसचे सरकार गेल्यानंतर बाबासाहेबांना सन्मान मिळाला आहे. त्यामुळे संविधान बदलविण्याचे काम काँग्रेसचे नेते करत असल्याची टीका त्यांनी केली.