नागपूर: नागपुरात शुक्रवारी रात्री चार तासात तब्बल १०० मिमी पावसाची नोंद झाली असून पाऊस अद्याप सुरूच आहे. संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सकाळी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली व पूरपीडितांना तत्काळ मदतीच्या सूचना दिल्या. हेही वाचा. नागपूरकरांनो आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, महापालिकेचा सतर्कतेचा इशारा हेही वाचा. नागपूर : मुसळधार पावसाचा तडाखा, शंकर नगरसह महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित फडणवीस यांनी यासंदर्भात टि्व्टट केले आहे. त्यात ते म्हणतात “ नागपुरात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला त्यामुळे काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अवघ्या चार तासात १०० मि.मी. पाऊस झाल्याची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहचले आहेत. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक तर तर एसडीआरएफच्या दोन चमू बचाव कार्यात तैत करण्यात आल्या आहेत, सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवूनआहे.”