नागपूर : वर्धा मार्गावरील छत्रपती चौक ते मानेवाडा रिंगरोडवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी नरेंद्रगर ते वर्धा रोडवरील जयप्रकाश नगर असा उड्डाण पूल बांधण्यात आला. मात्र या पुलाच्या रचनेतील त्रुटीमुळे तो मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. वर्धामार्गावरून येणाऱ्या या उड्डाण पुलाची लँडिंग चुकली असून ती थेट चौकात असल्यामुळे वाहनचालकांसाठी धोक्याची ठरली आहे. त्यामुळे नरेंद्रनगर चौकात जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते.

पूर्वीचा नरेंद्रनगर चौकाजवळील एकमेव आरयुबीमुळे रोज तासनतास वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावर भरधाव वाहन चालविणे अनेकांच्या जीवावर बेतत होते. या मार्गावरील अपघातांची संख्या बघता नागरिकांनीच पुढाकार घेऊन प्रशासनाला न्यायालयाच्या माध्यमातून धारेवर धरले. अखेर प्रशासन जागे झाले व दुसरा आरयुबी तयार केला.त्यामुळे जाण्याचा व येण्याचा मार्ग स्वतंत्र झाला. रिंग रोडने येऊन ज्यांना वर्धा मार्गाकडे जायचे आहे त्यांना आता छत्रपतीनगर चौकातून जाण्याची गरज नाही. ते नरेंद्रनगर चौकातील उड्डाण पुलावरून जाऊ शकतात. ही सोय झाली असली तरी उड्डाणपुल बांधताना काही त्रुटींचा विचार करण्यात आला नाही. वर्धा मार्गावर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ सुरू होणारा हा पूल नरेंद्रनगरालगत रिंग रोडवर उतरतो. पूर्वी रिंग रोडवरून नरेंद्रनगरात जायला एक मुख्य मार्ग होता. पुलामुळे हा मार्ग बंद झाला. मानेवाड्याकडून येणारी आणि पुलावर जायला वळणारी वाहने यांच्यात अपघात होण्याची भीती असते. पुलाच्या बाजुला नागरिकांना दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही. या उड्डाण पुलामुळे नरेंद्रनगर दोन भागात विभागले गेले आहे. एका भागातून दुसरीकडे जायचे असेल तर पुलाच्या बाजूच्या रस्त्यांचा वापर व्हायला हवा. पण पूल जेथे उतरतो तेथूनच लोक रस्ता ओलांडतात व हे अपघाताला निमंत्रण देणारे ठरते.

Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
Landing of Manishnagar flyover is dangerous
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक
Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

हेही वाचा…नागपूर : सावधान! ब्युटीपार्लर-स्पाच्या नावावर ‘सेक्स रॅकेट सक्रिय

चौकात आयलँडची गरज

नरेंद्रनगर चौकात गोलाकार आयलँड तयार केल्यास अपघातावर नियंत्रण मिळू शकते. वाहने गोलाकार वळण घेऊन गेल्यास अपघात होण्याची शक्यता मावळते. या चौकातून नरेंद्रनगराकडे जाणारा रस्ता रुंद केल्यास पुलाजवळ वाहनांची कोंडी होणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्या रस्त्याने कुठे वळायचे याबाबत ठळक सूचना लिहून त्यावर रेडियम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. या चौकातील स्मार्ट पोलीस बूथही एका कोपऱ्यात असल्यामुळे चौकात वाहतूक पोलीस नसल्याचे भास होतो. त्यामुळे वाहनचालक सिग्नल तोडून सुसाट वाहन पळवितात.

पुलाच्या बाजुचे दोन्ही रस्ते अरुंद

पुलाच्या दोन्ही बाजूंनी दोन अरुंद रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र, दोन्ही रस्ते वन वे आहेत की टू वे आहेत याबाबत कोणताही फलक लावण्यात आला नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो आहे. उड्डाणपुल उभारल्यामुळे खालच्या दोन्ही रस्त्याच्या जवळच विजेचे खांब आहेत. त्यालाही वाहन धडकण्याची शक्यता असते.

हेही वाचा…राज्यातील वीज पुरवठा धोक्यात! कंत्राटी वीज कर्मचारी संपावर

मानेवाडा-छत्रपती रस्ता नेहमी खोदलेला

मानेवाडा ते छत्रपती चौकापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, शताब्दी चौकात रस्ता खोदलेला आहे. त्यानंतर सुयोगनगर चौकातही एका बाजुचा रस्ता खोदलेला आहे. तर नरेंद्रनगर आरयुबी एका बाजुने बंद आहे. त्यामुळे एकाच भुयारी मार्गाखालून दोन्ही बाजूची वाहतूक सुरु असते. आरयुबीचे बांधकामामुळे आणि वारंवार खोदकामामुळे वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहेत.

नरेंद्रनगर पुलाखाली साचते पाणी

नरेंद्रनगरात नवीन उड्डाणपुल निर्माण झाल्याने वाहनचालकांना चांगली सुविधा झाली. मात्र, दर पावसाळ्यात उड्डाणपुलाच्या खाली पावसाचे पाणी जमा होते. त्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या खालच्या बाजुला राहणाऱ्या वस्तीसाठी हा उड्डाणपुल डोकेदुखी ठरत आहे. पुल बांधतानाही ही बाजूसुद्धा लक्षात घ्यायला हवी होती, अशी भावना नागरिकांच्या आहेत.

हेही वाचा…वर्धा : कार्यक्रम सोडून खानावळी झोडणारा संपर्कप्रमुख नको! – कोणाचा आहे आरोप जाणून घ्या…

चौकाला अतिक्रमणाचा विळखा

नरेंद्रनगर चौक हा वर्दळीचा चौक असून या परिसरातील नागरिक चौकातच चहा-नाश्ता करायला येतात. तसेच वाहनचालकही नरेद्रनगर चौकात वाहन थांबवून नाश्ता करतात. त्यामुळे या चौकाला अतिक्रमणाचा विळखा आहे. रस्त्यावर आणि पदपाथावर हातठेले,पानठेले लागल्यामुळे ग्राहकांची गर्दी आणि त्यांची रस्त्यावर उभी राहणारी वाहने डोकेदुखी ठरत आहेत. मात्र, या बाबीकडे महापालिका आणि वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात.

नरेंद्रनगर चौकातून थोडे पुढे जाताच रस्त्यावरच भाजीपाल्याचे हातठेले लावलेले आहेत. तसेच फळविक्रेत्यांनी पदपाथ गिळंकृत केला आहे. त्यांच्याकडून भाजी किंवा फळे घेणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. त्यामुळे वाहनचालाकांना मनस्ताप सहन करावा लागतो. – नितीन मोंढे (वाहनचालक)

हेही वाचा…यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटांचा हार, काय आहे प्रकार…

नरेन्द्रनगर ते म्हाळगीनगरपर्यंत नव्याने सिग्नल बसविण्याबाबत संबधित विभागास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सिग्नलवर पुरेश्या प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात येत असतात. नरेंद्रनगर चौकात वाहतूक नियमभंग करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन अधिनियमान्वये कारवाई, दंड वसूल करण्यात येत आहे. वाहतूक नियमभंग होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात येत असते. – रितेश अहेर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.