नागपूर : आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आता शनिवारी तो नागपूर गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण करणार आहे. त्या संदर्भात त्याने तयारी केली असून शनिवारी तो थेट गुन्हे शाखेत हजर होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बनावट ऑनलाईन गेमींग अॅप बनवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची शेकडो कोटींनी फसवणूक करणारा बुकी सोंटू जैन हा नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्याला आतापर्यंत शोधण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. सोंटू हा राज्यातून पसार झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता मावळली होती. सोंटूकडे सध्या शेकडो कोटींची संपत्ती असून ती संपत्ती त्याने अनेक नातेवाईक, मित्र आणि नोकरांच्या नावे करून ठेवली आहे.

हेही वाचा : मध्य रेल्वेचा दिलासा ! दसरा, दिवाळीनिमित्त विशेष गाड्या धावणार

तसेच त्याने कोट्यवधीची रोख रक्कम कुठेतरी दडवून ठेवली आहे. गोंदियातील सोंटू जैनने नागपुरातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पळून गेला होता. सोंटूच्या घरातून १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १८ कोटींची रक्कम जप्त केली. तसेच जवळपास १०० कोटींची अन्य मालमत्ता जप्त केली.

हेही वाचा : राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना दिवाळीत पदोन्नतीचे ‘गिफ्ट’; रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाल्याने आनंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोंटूने पाण्यासारखा पैसा खर्च करून अटकपूर्व जामीन मिळवला होता. मात्र, त्याचा जामीन सर्वोच्च न्यायालयातून फेटाळल्यामुळे सोंटूकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. पोलिसांच्या डोळ्यासमोरून नाट्यमयरित्या पळून गेलेला सोंटू आता गुन्हे शाखेसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.