नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात १०० मी.मी.हून अधिक पाऊस पडल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने त्याचे पाणी तलावा लगतच्या अंबाझरी स्मशानभूमीत शिरले. त्याचप्रमाणे गंगाबाई घाट व वाठोडा परिसरातील दहन घाटावर पाणी असल्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार होऊ शकले नाही त्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली. तेथील लाकडे ओली झाली. त्यामुळे तेथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे अवघड झाले. अशीच स्थिती शहराच्या अन्य स्मशानभूमींची आहे.

त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न शनिवारी दुपारपर्यंत नागपुरात पडला होता. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तेथील पाणी अंबाझरी स्मशानभूमीत शिरले. सकाळी तीन ते चार फूट पाणी स्मशानभूमीत होते. दहनघाट पूर्ण पाण्याखाली गेले होते. तेथील लाकडे पाण्याखाली बुडाली. पश्चिम आणि दक्षिण पश्चिम नागपूरसाठी हा एक प्रमुख दहन घाट आहे. अंबाझरी घाटाला लागून असलेली नागनदी भरल्यामुळे नाल्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे घाटाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता.

हेही वाचा : “तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय घाटाकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. घाटाच्या परिसरात पाणी असल्यामुळे कोणालाही आतमध्ये सोडले जात नव्हते. दुपारी १२ नंतर पाणी उतरल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी घाट परिसर मोकळा करण्यात आला. मात्र गंगाबाई वाठोडा घाटावरील पाणी १२ वाजेपर्यंत उतरले नाही. त्यामुळे दोन्ही घाट बंद होते. घाटावरील पाणी उतरत असल्यामुळे तासाभरात दोन्ही घाट सुरू होतील, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.