नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा दहशतवादी जयेश पुजारी याची न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा बेळगाव तुरुंगात रवानगी करण्यात आली. जयेश हा लष्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, पीएफआयसह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी दिली होती. कर्नाटकमधील तुरुंगातून त्याने हे फोन केले होते.

नागपूर पोलिसांनी त्याला २८ मार्च रोजी बंगळुरू तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर अटक करून नागपुरात आणले. चौकशीदरम्यान त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध आणि त्यांच्या मदतीने अनेक मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणल्याचा खुलासा झाला. त्याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल होते. जयेशला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : बुलढाणा : धाड येथे १ कोटीचा गांजा जप्त, ट्रकही ताब्यात; तस्करीचे ‘मराठवाडा कनेक्शन’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयेशवर कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचाही तपास सुरु आहे. बुधवारी सायंकाळी त्याला कारागृहातून नागपूर पोलिसांच्या विशेष पथकाच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर त्याला बुधवारी रात्री आठ वाजता विमानाने बेळगावला नेण्यात आले.