नागपूर: खापरखेड्यातील राख बंधारा फुटल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी महानिर्मिती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत (एमबीसीबी) बैठक घेतली. याप्रसंगी राख विल्हेवाटीच्या कायमस्वरूपी नियोजनाच्या सूचना दिल्या गेल्या. दुसरीकडे महानिर्मितीसह एमपीसीबीला या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचा राख बंधारा गेल्यावर्षी जुलै २०२२ मध्ये फुटला होता. त्यानंतर येथील राखमिश्रित पाणी परिसरातील शेतांसह जवळच्या नदीतून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले. आता पुन्हा १९ जुलै रोजी पावसामुळे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा राख बंधारा फुटून राखमिश्रित पाणी परिसरातील शेतीत शिरले. महानिर्मितीकडून १०० टक्के राखेचा वापर केला जात नाही. त्यामुळे एमपीसीबीकडून महानिर्मितीला खापरखेडा राख बंधारा फुटल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली गेली.

हेही वाचा… पाणी जपून वापरा! भर पावसात अकोलेकरांनो जल संकट; वाचा कारण काय ते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर आल्यावर ते एमपीसीबी बोर्डाकडे पाठवून त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे एमपीसीबीच्या नागपूर प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी सांगितले. सरकारच्या राख धोरणानुसार १०० टक्के राखेचा वापर आणि राख बंधारा पुढे फुटणार नाही, यासाठी कायमस्वरूपी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून महानिर्मितीला देण्यात आल्या. याप्रसंगी महानिर्मिती, एमपीसीबीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.