लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपूर जिल्ह्यासह मध्यप्रदेशात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला शिताफीने अटक केली. या टोळीतील म्होरक्याला पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन अटक केली, हे विशेष.

मोहम्मद शहबाज ऊर्फ घुंगरू मोहम्मद सलीम अन्सारी (३१), मोहम्मद जुबेल ऊर्फ जाबीर बरकतअली हैदरी (२५), सलाउद्दीन वल्द समसुद्दीन पठाण (३१), योगेश दामोदर श्रीरंग (३५) असे चारही आरोपींचे नाव आहे. नागपूर जिल्ह्यात घरफोडीच्या घटना वाढत आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेला यातील म्होरक्या मोहम्मद शहबाज हा राजस्थानला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तेथे दोन चमू पाठवली गेली.

आणखी वाचा- मोफत वीज शक्य नाही, भाजपचे सहमुख्य प्रवक्ता विश्वास पाठक यांचे स्पष्ट मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी आरोपीला नागपुरात आणून खाक्या दाखवला. त्यामुळे त्याने इतरही तीन आरोपींची नावे सांगितली. सोबत नागपुरातील खापरखेडा १, नरखेड ३, कुही ४, काटोल ४, सावनेर १, मौदा १, बुटीबोरी १, अरोली १, पारशिवनी १, वर्धा ३, मध्य प्रदेशातील शिवनीतील १ असे एकूण १५ गुन्हे केल्याचे कबूल केले. यावेळी आरोपीकडून पोलिसांनी शिताफीने १८ लाख ६९ हजार १८० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, अनिल राऊत, राजीव कर्मलवार, आशीषसिंग ठाकूर आणि इतरांनी केली.