जिल्ह्यातील ८५ टक्के अपघात १० टक्के ठराविक मार्गांवर झाल्याचा उलगडा सर्वोच्च न्यायालय रस्ता सुरक्षा समितीच्या हाॅटेल रेडिसन ब्लू येथे झालेल्या सोमवारच्या बैठकीत झाला.सर्वोच्च न्यायालयाने रस्ता अपघाताशी संबंधित २५ मार्गदर्शक तत्त्वे दिली होती.या तत्त्वांचे पालन करून अपघात कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती गठित केली. ही समिती देशभरात रस्ते अपघाताचा आढावा घेते. नागपुरातील बैठकीत जिल्ह्यातील अपघाताची सविस्तर माहिती दिली गेली. यावेळी जिल्ह्यातील ८५ टक्के अपघात हे १० टक्के ठराविक मार्गावर होत असल्याचे पुढे आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर: शाळेत तणाव, मतिमंद मुलीचा विनयभंग

या मार्गावर अपघात कमी करण्यासाठी आरटीओ, शहर व ग्रामीण पोलिसांसह इतर विभागांच्या मदतीने उपाय केले जाणार आहेत. मुंबई- पुणे नवीन व जुन्या महामार्गावर परिवहन विभागाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याचा परिणाम आता दिसायला लागला असून येथे अपघात कमी घडत आहेत. जास्त गतीने वाहन चालवणाऱ्या खासगी वाहनांना अडवून वाहन चालकांचे समूपदेशन केले जात आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली.

हेही वाचा >>>सात महिन्यांत ‘एमपीएससी’चा अभ्यास कसा करणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे निर्देश
कोणत्याही परिस्थितीत अपघात व अपघाती मृत्यू कमी व्हावे
मुलांना प्राथमिक स्तरावर रस्ते सुरक्षा संदर्भात प्रशिक्षणा देण्यात यावे
शालेय स्तरावर रस्ते सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम घ्यावे
हेल्मेटशिवाय कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात घेऊ नये
जिल्ह्यातील अपघात प्रणवस्थळे तातडीने कमी करावी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It was revealed that 85 percent of the accidents in the district occurred on 10 percent of certain roads mnb 82 amy
First published on: 13-12-2022 at 11:03 IST