scorecardresearch

“भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्या भातखळकरांवर कारवाई करा”, जयंत पाटलांची मागणी; म्हणाले, “हा प्रकार…”

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

“भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्या भातखळकरांवर कारवाई करा”, जयंत पाटलांची मागणी; म्हणाले, “हा प्रकार…”
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, भुजबळांच्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच हा प्रकार गंभीर असून अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आज विधानसभेत केली.

हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2022 Live : छगन भुजबळांच्या मुंबईवरील विधानावरून विधानसभेत गदारोळ; हिवाळी अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

भातखळकरांनी ट्वीट केला होता भुजबळांचा फोटो

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची लाल टोपी घातलेला एका फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तसेच ”सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांताक्लॉज” असे कॅप्शनदेखील त्यांनी या फोटोला दिले होते.

भातखळकरांवर कारवाई करा

भातखळकरांच्या ट्वीटवर आक्षेप घेत, छगन भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला. “सभागृहातील सदस्य दुसऱ्या ज्येष्ठ सदस्यांच्या फोटोशी छेडछाड करून सोशल मीडियावर शेअर करत असतील, तर ते योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच गृहमंत्र्यांनी भातखळकरांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – China Covid Cases: “लॉकडाउन विसरु नका”, अजित पवारांनी आठवण करुन दिल्यानंतर फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले “तुम्ही…”

दरम्यान, याबाबत बोलताना राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये. त्यांनी सोशल मीडियावरील संहिता पाळाव्यात, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 15:34 IST

संबंधित बातम्या